SSR Birth Anniversary : सुशांत सिंग राजपूतच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त 35,000 डॉलर्सचा मेमोरिअल फंड

एमपीसी न्यूज : दिवंगत अभिनेता सुशांत सिग राजपूतच्या 35व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बहिणीने समाजमाध्यमांवर एक भावुक अशी पोस्ट टाकली आहे. यांत तिने भावाबरोबरचे काही फोटो शेअर केले असून कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना 35 हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती सुशांतच्या नावे देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. 21 जानेवारी 1986 रोजी सुशांतचा जन्म झाला.

बहीण श्वेता सिंग किर्तीच्या अनुसार भारतातील व भारताबाहेरील विद्यार्थ्यांना मोफत आणि चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे असे सुशांतचे स्वप्न होते. या आशयाची पोस्ट सुशांतनेदेखील 2019 साली शेअर केली होती. हे स्वप्न आता या शिष्यवृत्तीने पूर्ण होणार आहे.

मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की, भावाने बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या 35 व्या वाढदिवशी आम्ही एक पायरी चढली आहे. 35,000 डॉलर्सचा सुशांत सिंग राजपूत मेमोरिअल फंड आम्ही कॅलिफोर्निया विद्यापीठात, बर्कले येथे स्थापन केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये ॲस्ट्रोफिजीक्स शिकायचे आहे, ते विद्यार्थी या फंडसाठी ॲप्लाय करु शकतात. ज्यांनी यासाठी मदत केली आहे, त्यांचे खूप आभार. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, छोट्या भावा. मला आशा आहे, तू जिथे असशील तिथे आनंदीच असशील. खूप प्रेम, असा संदेश असलेली पोस्ट श्वेता सिंग किर्तीने समाजमाध्यमांवर शेअर केली आहे.

या पोस्टबरोबरच श्वेताने सुशांतबरोबरचे फोटो कोलाज करूनही टाकले आहेत. यांत अन्य कुटुंबियदेखील दिसत आहेत. खूप प्रेम भावा, तू नेहमीच माझा हिस्सा राहशील असा संदेशही श्वेता सिंगने टाकला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.