SSR Suicide : पटण्याहून आलेल्या ‘एसपी’ ला मुंबई महापालिकेने सक्तीने केलं ‘होम क्वारंटाइन’

सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास करण्यासाठी हे पथक मुंबईत आले आहे.

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाइन केलं आहे.

बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी रविवारी हा आरोप केला. विनय तिवारी मुंबईत तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करत आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास करण्यासाठी हे पथक मुंबईत आले आहे.

बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. पण रात्री 11 वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केलं, आता ते या ठिकाणाहून कुठे जाऊ शकत नाहीत असे टि्वटमध्ये म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला वांद्रयातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मागच्या महिन्यात सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला व तक्रारीत रिया चक्रवर्तीचे नाव घेतले. मुंबई पोलीस सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींसह 40 जणांची या प्रकरणी चौकश करण्यात आली आहे.

सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. तर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करत नसून योग्य तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विनयकुमार यांच्याबद्दल आम्ही महाराष्ट्राचे डीजीपी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे बिहार डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.