Pune : दिवाळीसाठी एसटीच्या जादा बसेस !

एमपीसी न्यूज – दिवाळी सणानिमित्त गावाकडे जाणार्यांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बसेसची सोय केली आहे विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह राज्यातील इतर भागातील प्रवाशांसाठी ही सोय करण्यात आली दि. 1 ते 6 नोव्हेंबरदरम्यान नियमित बसेसबरोबरच जादा बसेस सोडल्या जाणार आहेत अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी या कालावधीत वाकडेवाडी येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदान, पिंपरी-चिंचवड, स्वारगेट बसस्थानकातून ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहे. यासाठी आरक्षण सुरू झाले असून महामंडळाच्या संकेतस्थळावरून किंवा मोबाईल अँप वरून आरक्षण करता येणार आहे. तर प्रवाशांनी ज्यादा बसेसच्या वेळापत्रकासाठी संबंधित आगारात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
येथून सुटणार बस 
शिवाजीनगर : नाशिक , औरंगाबाद आदी.

कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदान ( वाकडेवाडी ) : नागपूर , अकोला  ,अमरावती  , अंबड , अहमदपूर , आंबेजोगाई , बीड , औसा , हिंगोली , जाफराबाद , जालना , लातूर , जळगाव , नांदेड , उस्मानाबाद , परळी , परभणी , तुळजापूर
पिंपरी – चिंचवड : कोल्हापूर , चिपळूण , लातूर आदी.
स्वारगेट : सांगली , सातारा , कोल्हापूर , सोलापूर आदी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.