ST Buses : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामुळे एसटी बसेसचा तुटवडा, सर्व सामान्यांचे हाल

एमपीसी न्यूज : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यामुळे एस टी बसेस (ST Buses) कमी संख्येने धावत असल्यामुळे  पिंपरी-चिंचवड शहरात बाहेरगावी जाणाऱ्या बस साठी सर्व सामान्यांना वाट पाहावी लागत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या बसेस ला सामान्य माणसे एस टी बसेस म्हणून ओळखतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातील शहरे व गावांना जाण्यासाठी सामान्य माणूस एससी बसेस चा वापर करत असतो. आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स( बीकेसी), बांद्रा येथे होणार आहे. शिंदे गटाने अंदाजे तीन हजार एसटी बसेस या मेळाव्यासाठी बुक केल्या आहेत. त्यामुळे आज राज्यभरात एसटी बसेसेचा तुटवडा जाणवत आहे, परिणामी नागरिकांचे हाल होत आहेत.

एसटी बसेसच्या कमतरतेमुळे प्रवाशांवर विपरीत परिणाम होतो की नाही हे पाहण्यासाठी एमपीसी न्यूजच्या वार्ताहराने पिंपरी-ृचिंचवड शहरातील एस टी बस आगार व थांब्यांची पाहणी केली.(ST Buses) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे एकमेव बस आगार पिंपरी मधील संत तुकाराम नगर येथे आहे. नेहमी प्रवासी व बसेसने गजबजलेल्या हा आगार असतो. पण आज सकाळी येथे शुकशुकाट दिसत होता.येथे बसची वाट पाहत बसणारे प्रवासी खूप कमी होते. तसेच प्लॅटफॉर्मवर सुद्धा खूप कमी बसेस उभ्या होत्या.

Flower market : झेंडूने खाल्ला भाव ; 100 ते 150 रुपये किलो दर

प्रवासी आकाश लोंढे म्हाणाली की, ती निगडी येथे राहत असून. आज सोलापूरला जाण्यासाठी आले आहेत. मी येथे दहा मिनिटे पूर्वी आले होते. सोलापूरला  जाणारी बस 15 मिनिटानंतर येण्याची अपेक्षा आहे.(ST Buses) दुसरे प्रवासी अमजद शेख म्हणाले की, “या आगारातून सोलापूर, सातारा, उस्मानाबाद व इतर शहरासाठी बसेस सुटत असल्यामुळे येथे आल्यावर बस मध्ये बसायला सीट मिळते. त्यामुळे मी निगडी ला राहत असून देखील घरच्यांना येथून बस मध्ये बसवण्यासाठी आलो आहे. माझ्या घरच्यांना गावी जायचे आहे.”

वर्षा डहाके, वाहतूक नियंत्रक, संत तुकाराम नगर एसटी बस आगार म्हणाल्या की आज सण असल्यामुळे प्रवासी कमी आहेत. त्यामुळे काही बस च्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.”पुणे मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशन येथील एसटी बस थांब्यावरती आज सकाळी कमी गर्दी पाहायला मिळाली.(ST Buses) योगेश पवार म्हणाले की, “मी टेल्को रोड येथे राहत असून आज मला कामानिमित्त  पनवेलला जायचे आहे. मी येथे एक तास बसची वाट पाहत बसलो आहे.”अशोक मोरे म्हणाले की, “मला आज पेन ला जायचे आहे. सुमारे दिड तास मी येथे बसची वाट पाहत बसलो आहे.”

निगडी मध्ये टिळक चौकाजवळील एसटी बस थांब्यावर सुद्धा आज सकाळी कमी गर्दी दिसत होती. प्राजक्ता कुंबलवार म्हणाल्या की, ” आज मला बोरिवली ला जायचे आहे. मी येथे दीड तास झाले बसची वाट पाहत बसली आहे.”त्रस्त प्रवासी सीताबाई घाडी म्हणाल्या की, “मी निगडी येथे माझ्या भावाकडे काही दिवस राहायला आले होते. आज मला माझ्या घरी बोरीवली ला जायचे आहे. मी सुद्धा येथे दीड तास झाले बसची वाट पाहत बसली आहे.” त्रस्त प्रवासी मीना साळुंखे म्हणाला की, ” मी चिखली येथील साने चौकाजवळ राहते. आज मला बोरिवलीला जायचे आहे. मी सुद्धा येथे दीड तास झाले बसची वाट पाहत बसली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.