ST Driver Heart attack: एसटीचे स्टेअरिंग हातात असतानाच चालकाला हार्ट अटॅक, अखेरच्या क्षणी 25 जणांना जीवदान

एमपीसी न्यूज: एसटीचे स्टेअरिंग हातात असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या दुर्घटनेत चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.(ST Driver Heart attack) मात्र अशा परिस्थितीतही या चालकाने जीवाची बाजी लावून एसटीतल्या 25 प्रवाशांचे प्राण वाचवले. पुणे सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ ही घटना घडली. जालिंदर रंगराव पवार (वय 45) असे संबंधित चालकाचे नाव आहे.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी, जालिंदर पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील रहिवासी आहेत. राज्य परिवहन महामंडळाची वसई आगाराची एसटी बस घेऊन ते म्हसवडच्या दिशेने जात होते. पुणे सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ आल्यानंतर पवार यांना चक्कर येत असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Talegaon-Dabhade : आईचे दूध बाळासाठी अमृत 

 

जालिंदर पवार यांनी प्रसंगावधान दाखवत क्षणाचाही विचार न करता बस रस्त्याच्या कडेला दिल्यामुळे बसमधील पंचवीस प्रवाशांचे प्राण वाचले. (ST Driver Heart attack) स्टेरिंग वर निपचित पडलेल्या जालिंदर यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयातही नेण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले. त्यामुळे जाता जाता 25 जणांचे प्राण वाचवणाऱ्या या चालकाच्या जाण्याने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.