ST Employees Andolan : दोन महिन्यांचे थकित वेतन द्या ; अन्यथा आक्रोश आंदोलन करू : एस. टी. कर्मचारी संघटना

एमपीसी न्यूज : एस. टी. परिवहन महामंडळाने मागील दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतनच दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष वाढत आहे. सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित थकित वेतन द्यावे अन्यथा ऐन दिवाळीत सर्व एस. टी. कर्मचारी कुटुंबियांसह 9 नोव्हेंबरला आक्रोश आंदोलन करतील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित द्यावे तसेच एस. टी. महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यभरात दोन हजारांहून अधिक कर्मचारी कोरोनाबधित झाले असून आत्तापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्हा सर्वांची दिवाळी चांगली जावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या काळात एस. टी. बससेवा देण्यासाठी लाखो चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी अहोरात्र झटत होते. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून एस. टी. बसेस धावत होते. परंतु एस. टी. महामंडळ तोट्यात असल्याचे कारण देत वेतन थकले होते. परंतु सध्या एस. टी. बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आता राज्यसरकार एस. टी. कर्मचाऱ्यांना थकित वेतन दोत दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.