pimpri : एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

एमपीसी न्यूज -देहुरोड येथील सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल या विद्यालयातील एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये इयत्ता सातवीतील अन्सारी साहिबा मिनाझ या विद्यार्थिनीने ‘अ’ श्रेणी संपादन केली. तिच्या या यशाचे कौतुक विद्यालयातून होत आहे.

या परीक्षेमध्ये ‘ब’ श्रेणीमध्ये चार विद्यार्थी झाले. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये इयत्ता नववीमध्ये हिंदवी भोसले आणि साक्षी शिंदे या दोन विद्यार्थिनीनी ‘अ’ श्रेणी संपादन केली. ‘ब’ श्रेणीमध्ये 10 विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल लागला. परीक्षेच्या तयारीसाठी कलाशिक्षक श्रीकांत बाळासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुकादेवी कोरनाथ, उपमुख्याध्यापिका स्मिता गिरी आदींनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.