ST Workers Strike : एसटी कामगार संप! महामंडळाला तब्बल 279 कोटींचे नुकसान

एमपीसी न्यूज – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर काम बंद आंदोलन सुरू आहे. कामगारांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रशासन दबावतंत्राचा अवलंब करीत असले तरी, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पण, एसटी सेवा बंद असल्याने महामंडळाला तब्बल 279 कोटींचे नुकसान झाले आहे.

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 27 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला तब्बल 279 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्यातील बसेस सध्या संथ गतीने सुरू आहेत. त्यातच मुंबईतील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला आहे.

आतापर्यंत राज्य शासनाने शेकडो कामगारांना निलंबित केलं आहे. मात्र, कामगार संघटना त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. दरम्यान, एसटी संपाच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. सर्व मुद्यांवरही चर्चा करायला तयार आहे, मात्र संप मागे घ्या. चर्चा करुया, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.