ST Workers Strike : राज्यातील 105 आगार सुरू, 19 हजार कर्मचारी कामावर रूजू

एमपीसी न्यूज – एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मागील एक महिन्यापासून राज्यातील एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी कामगारांना कामावर परतण्याबाबत केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी (दि. 06) राज्यातील 250 आगारांपैकी 105 आगार सुरू झाले असून, 19 हजार कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. रविवारी 734 बसगाड्या द्वारे सुमारे 1 हजार 73 फेऱ्यांतून एक लाख 4 हजार 800 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. त्यातून महामंडळाच्या तिजोरीत 76 लाख 30 हजार रुपयांची भर पडली. संपाच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत 40 हून अधिक बसेस फोडण्यात आल्या आहेत.

एसटीच्या आवारात बसेस अडवणे, शिवीगाळ करणे, गेट बंद करणे यासारख्या घटनांवरून 93 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील 250 पैकी अद्यापही 145 आगार बंदच आहेत. दरम्यान 105 आगार पूर्वपत झाल्याने महामंडळाच्या अर्थकारणाचे रूतलेले चाक पुन्हा सुरू झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.