Chakan News : चपात्या बनविण्यास सांगितल्याच्या कारणावरून मामावर चाकूने वार; भाच्याला अटक

0

एमपीसी न्यूज – मामाने भाच्याला चपात्या बनविण्यास सांगितले. या कारणावरून भाच्याने कांदा कापण्याच्या चाकूने मामावर वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री अमृतनगर, मेदनकरवाडी येथे घडली. पोलिसांनी भाच्याला अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सचिन विलास देसाई (वय 22, रा. वीटभट्टी, गोरेगाव ईस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या भाच्याचे नाव आहे. याबाबत गजानन सुरेश खैरे (वय 32, रा. अमृतनगर, मेदनकरवाडी, ता. खेड. मूळ रा. जळगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन आणि आरोपी सचिन हे मामा भाचे आहेत. अमृतनगर मेदनकरवाडी येथे फिर्यादी गजानन भाड्याच्या खोलीत राहतात. शुक्रवारी रात्री स्वयंपाक करण्याच्या वेळी फिर्यादी यांनी आरोपी भाचा सचिन याला चपात्या बनविण्यास सांगितले.

सचिन याने चपात्या बनविण्यास नकार दिला. तसेच कांदा कापण्याच्या चाकूने फिर्यादी यांच्या पोटावर वार करून गंभीर दुखापत केली. त्याने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment