Pune : पुण्यात स्कूलबस वर दगडफेक ; खासदार अनिल शिरोळेंनी शेअर केले फोटो

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पुण्यात एक लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून ‘भारत बंद’च्या माध्यमातून केला जात आहे. 

पुण्यात देखील या बंदचे पडसाद उमटायला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी कुमठेकर रस्त्यावर पीएमटी बस वर दगडफेक करत आंदोलनाला सुरवात केली तर कोथरूड मध्ये काही अज्ञातांनी पहाटे एक पीएमटी बस ला आग लावल्याची घटना समोर आली आहे.

मात्र आता पुण्यात या आंदोलनात स्कुलबस वर दगडफेक झाल्याचा दावा पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी केला आहे. पुण्यातील संस्कृती हायस्कुल आणि अजून एका महाविद्यालयाच्या बस वर दगडफेक झाल्याचे फोटो अनिल शिरोळे यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केले आहेत.

त्याचबरोबर ,  तथाकथित विरोधी पक्षांनो तुम्हाला निषेधाचा अधिकार जरूर आहे परंतु तरुणांना भ्रमित करून, निर्दोष शालेय मुलांना वर निशाण साधून, सार्वजनिक मालमत्ता नष्ट करून, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी नागरिकांना मध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न कारणे तुमच्या नेत्यांची दयनीय परिस्थिती उदाहरण आहे. अशा शब्दांत अनिल  शिरोळे यांनी आंदोलनकर्त्यांनी फटकारले देखील आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.