Stamp Duty on All Mortgages : खुशखबर…सर्व प्रकारच्या गहाणखतांवर एकसमान स्टँप ड्यूटी !

एमपीसी न्यूज : इक्‍विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज (साधे गहाणखत) या दोन्हींवर आकारण्यात येणारी मुद्रांक शुल्क (स्टँप ड्यूटी) आता एकसारखी आकारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे दोन्ही प्रकाराच्या गहाणखतासाठी आता 0.3 टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.

गहाणखताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी ईक्‍विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज यांचा सर्वाधिक वापर होतो. परंतु त्यासाठी वेगवेगळी स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. इक्विटेबल मॉर्गेजसाठी सध्या 0.2 टक्के, तर सिंपल मॉर्गेजसाठी 0.5 टक्के स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. अनेकदा त्यामुळे नागरिकांना गोंधळ होतो.

त्यातून वारंवार लोकांना सब रजिस्टर कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तसेच सिंपल मॉर्गेजसाठी पाच लाख रूपयांच्या आत कर्ज असेल, त्यावर 0.1 टक्के आणि त्यावरील रकमेचे कर्ज असेल, तर त्यावर 0.5 टक्के स्टॅम्प ड्यूटी भरावी लागत होती. सिंपल मार्गेज करणारा घटक हा प्रमुख्याने असंघटीत क्षेत्रातील असे. त्यामुळे त्यांना जादा स्टॅम्प ड्यूटी भरावी लागत होती. त्यामध्ये आता दोन टक्‍क्‍यांनी बचत होणार आहे.

दरवर्षी अशा प्रकारचे सुमारे पाच ते सहा लाख गहाणखताचे व्यवहार होतात. या दोन्ही मॉर्गेजमधील गोंधळ दूर करून त्यामध्ये सुटसुटीतपणा आणणे व त्यांचे शुल्क एकसमान करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे, त्यासाठी स्टॅम्प ऍक्‍टमध्ये दुरुस्ती करून या दोन्ही मॉर्गेजवर 0.3 टक्के मुद्रांक शुल्कच आकारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यास राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबरच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उत्पन्न देखील वाढण्यास मदत होणार आहे.

गेल्या वर्षी झालेले इक्विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेजची संख्या व त्यातून मिळालेले उत्पन्न खालील प्रमाणे :

इक्विटेबल मॉर्गेजची 2 लाख 88 हजार

-मिळालेले उत्पन्न 383 कोटी रुपये (0.2 टक्‍क्‍यांनी मिळालेले मुद्रांक शुल्क)

सिंपल मॉर्गेजची 3 लाख 65 हजार

– मिळालेले उत्पन्न 1 हजार 807 कोटी रुपये (0.5 टक्‍क्‍यांनी मिळालेले मुद्रांक शुल्क )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.