Pimpri: दोन मिनिटांत पावणेतीनशे कोटींच्या उपसूचनांसह अर्थसंकल्पाला ‘स्थायी’ची मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने  आज (गुरुवारी)अवघ्या दोन मिनिटांत पावणेतीनशे कोटींच्या उपसूचनांसह मंजुरी दिली. 42 उपसूचनांद्वारे तब्बल 267.50 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प 6 हजार 450 कोटी रुपयांवर पोहचला आहे. अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पाची तहकूब सभा आज पार पडली. सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.18)कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसलेला सन 2019-20 या आर्थिक वर्षांचा मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6, 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. त्यानंतर स्थायी समितीने दहा दिवस त्यावर अभ्यास केला.

त्यानंतर आज झालेल्या सभेत 42 उपसूचनांद्वारे तब्बल 267.50 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प 6 हजार 450 कोटी रुपयांवर पोहचला आहे. या अर्थसंकल्पला अवघ्या दोन मिनिटांत मंजुरी देत स्थायी समितीने अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.