Pune: ऑनलाईन पद्धतीने 350 कोटी रुपये कर जमा, जून महिन्यातही मिळणार सवलतीचा लाभ

standing committee chairman Hemant Rasane thanks Punekars for paying Rs 350 crore taxes online

एमपीसी न्यूज- ऑनलाईन पध्दतीने 350 कोटी रुपये कर भरणाऱ्या पुणेकरांचे आपण आभार मानत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे कर भरता न आलेल्यांना जून महिन्यातही 5 ते 10 टक्के असणारी सवलत सुरू राहणार आहे.

संपूर्ण जगासोबतच आपण पुणेकरही कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहोत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देश आणि राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.

गेली 65 दिवस लॉकडाऊनमध्ये असताना सुद्धा पुणे महापालिकेच्या तिजोरीत जवळपास 350 कोटी रुपये प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाईन पद्धतीने पुणेकरांनी जमा झाला. त्याबद्दल आपण आभार मानत असल्याचे रासने म्हणाले.

मागील वर्षी या कालावधीत 699 कोटी रुपये प्रॉपर्टी टॅक्स जमा झाला होता. यापुढील काळात ज्या पुणेकरांना लॉकडाऊनमुळे प्रॉपर्टी टॅक्स भरता आला नाही. त्यांच्यासाठी जून महिन्यातही 5 ते 10 टक्के असणारी सवलत सुरू राहणार आहे.

महापौर, सर्व पक्षीय नेते, स्थायी समिती सदस्य या सर्वांना त्यासाठी विचारात घेण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सर्वसाधारण सभा मान्यता देईल या भरवशावर सवलतीचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे.

जुलैमध्ये जो शस्तिकर आकारतो तो न आकारण्याचा निर्णय सर्वानुमते घेणार आहोत. त्यामुळे जून महिन्यातही सवलतीचा लाभ घेऊन प्रॉपर्टी टॅक्स मोठ्या प्रमाणात भरावा, असे आवाहन हेमंत रासने यांनी केले आहे.

दरम्यान, प्रॉपर्टी टॅक्समधून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळते. सध्या कोरोनाचा संकट काळात महापालिकेच्या तिजोरीत प्रचंड खळखळाट आहे. त्यामुळे पुणेकरांनी प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.