Pune : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये बी. जे वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा, त्यात क्ष -किरणशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, भूलतज्ञ, कान, नाक घसा, नेत्रशल्यचिकित्सा, औषधवैद्यक, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र, अस्थिव्यंगोचिचार व बालरोगचिकित्सा याचा समावेश असावा, असा प्रस्ताव शिवसेनेने स्थायी समितीला दिला आहे.

_MPC_DIR_MPU_II

शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे आणि प्राची आल्हाट यांनी हा प्रस्ताव दिला आहे. पालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये सेकंडरी केअर युनिट म्हणून कमला नेहरू रुग्णालय , सोनवणे रुग्णालय व नायडू रुग्णालय याठिकाणी पुणे शहरातील रुग्णांवर उपचार करण्यात येतात.पालिकेच्या दवाखान्यातून आणि रुग्णालयामधून अल्पउत्पन्न गटातील गरीब नागरिक उपचार घेत असतात. बऱ्याच वेळा रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असते. तथापि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याकरीत खर्च करण्याची अशा रुग्णांची परिस्थिती नसते. त्यामुळे पालिका रुग्णालय दवाखान्यात येणारे रुग्ण डॉक्टरांचा सल्ला न मिळाल्याने योग्य त्या उपचारापासून वंचित राहतात.

योग्य आणि प्रभावी सेवा मिळणे हा सर्वच नागरिकांचा हक्क आहे. म्हणून पालिका दवाखान्यात येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांना जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी कमला नेहरू रुग्णालय, सोनवणे रुग्णालय व नायडू रुग्णालय याठिकाणी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मांकनानुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून क्ष किरणशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, भूलतज्ज्ञ, कान, नाक प्रसूतीशास्त्र, अस्थिव्यंग व बालरोग चिकित्सा विभागांचे घसा, नेत्रशल्यचिकित्सा, औषधवैद्यक, स्त्रीरोग व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सुरु करावे, असे शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.