-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chakan News : चाकण शहरासाठी स्वतंत्र लसीकरणा केंद्र सुरु करा

आरोग्य व पालिका प्रशासनाला निवेदने

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : चाकणसाठी तालुका आरोग्य प्रशासन अत्यंत कमी लसी देत आहे. त्यामुळे चाकण शहरातील नागरिकांचे लसीकरण होत नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून तातडीने चाकण शहरासाठी आणखी लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.

सातत्याने चाकण सारख्या मोठ्या शहराला सापत्न वागणूक दिली जात असल्याने अखेरीस चाकण विकास मंचच्या वतीने खेड आरोग्य प्रशासन , चाकण ग्रामीण रुग्णालय आणि चाकण पालिका प्रशासन यांना निवेदन देऊन शहरातील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी तातडीने उपययोजना करण्यात करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

चाकण शहरासाठी स्वतंत्र दोन लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी चाकण ग्रामीण रुग्णालय आणि चाकण पालिका प्रशासनाला चाकण विकास मंचचे अध्यक्ष कुमार गोरे, चाकणचे माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, काळूराम कड, लक्ष्मण वाघ, चंद्रकांत गोरे, अनिल देशमुख आदींनी केली आहे.

म्हणून चाकणकर आक्रमक :  
चाकण लगतच्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चाकण पेक्षा अधिक लसी पुरवल्या जात आहेत. अशा ठिकाणची लसीकरण केंद्र स्थानिक नागरिक ताब्यात घेत आहेत. लगतच्या भागातून आलेल्या नागरिकांना येथून हाकलून दिले जात आहे. अनेक चाकणकर नागरिकांना याचा अनुभव आल्याने चाकण विकास मंचने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुख्याधिकारी म्हणतात …
चाकण शहरासाठी दोन लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी प्रातांधिकारी , तालुका आरोग्य प्रशासन, आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. त्याच बरोबर चाकण मधील सर्व डॉक्टरांचे या लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य मिळवले जाईल, असे आश्वासन यावेळी चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिले.

 

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.