Pimpri News : पोलीस परिवारासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करा

प्रांत पोलीस मित्र संघाची मागणी 

एमपीसी न्यूज – पोलीस परिवारासाठी स्वतंत्र कोरोना लसीकरण केंद्र सुरु करावे. प्रांत पोलीस मित्र संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. 

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रांत पोलीस मित्र संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी, रोटरी क्लब ऑफ पुणे कोस्मॉपोलिटिन अध्यक्ष शरद जोशी, प्रांत पोलीस मित्र संघांचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाचा शिरकाव देशात झाल्यापासून पोलीस रस्त्यावर उतरून काम करत आहेत. यामध्ये अनेकांना कोरोनाची लागण देखील झाली. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांच्या कुटुंबीयांना देखील कोरोना संसर्गाची लागण होण्याची भिती असते. त्यामुळे पोलीस परिवारासाठी स्वतंत्र कोरोना लसीकरण केंद्र सुरु करावे. अशी मागणी प्रांत पोलीस मित्र संघाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.