Chinchwad News: महाविद्यालये चालू करा, ‘अभाविप’चे आंदोलन

एमपीसी न्यूज – राज्यातील महाविद्यालये लवकरात-लवकर चालू करावीत या मागणीसाठी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी-चिंचवड महानगरच्या वतीने चापेकर चौकात आंदोलन करण्यात आले. महानगर सहमंत्री ओमकार देशमुख, अहमदनगर विस्तारक अशोक सैनी, प्रकित नाझरकर, वैभव बिरंगळ, प्रबल मल्होत्रा,सिद्धेश्वर लाड व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व महानगर सहमंत्री ओमकार देशमुख यांनी केले.

महाविद्यालये सुरु होण्यास विलंब होत आहे. शाळा सुरु झाल्या आहेत. पण, महाविद्यालये सुरु केली जात नाहीत. हे चुकीचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी येत्या चार दिवसात महाविद्यालये सुरु करावीत अशी मागणी ‘अभाविप’ने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.