Pimpri: शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये तात्पुरते आरोग्य तपासणी केंद्र चालू करा- जितेंद्र ननावरे

start health check up camps in slum dwellers in pimpri chinchwad says jitendra nanaware amid coronavirus

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. दीडशेहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. झोपडपट्यांमधील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील सर्वच झोपडपट्यांमध्ये तात्पुरते आरोग्य तपासणी केंद्र चालू करावीत, अशी मागणी माजी नगरसेवक तथा युवा सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात ननावरे यांनी म्हटले आहे की, आनंदनगरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे.

आनंदनगरप्रमाणे महात्मा फुलेनगरसह शहरातील झोपडपट्यांमध्ये लोकसंख्या मोठ्याप्रमाणात आहे. आनंदनगरमध्ये ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढली आहे. संसर्ग झाल्यास महात्मा फुलेनगर व शहरातील झोपडपट्यांची देखील अशीच अवस्था होईल.

झोपडपट्टीतील नागरिकांना कोरोना विषाणू बाबतीत अधिकची माहिती नाही. त्यांना गांभीर्य नसल्याने याचे दुष्परिणाम सर्वच शहराला भोगावे लागतील. त्यामुळे शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना विषाणूचा विस्फोट होण्यापूर्वी महापालिकेने यांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

त्यासाठी महापालिकेने तात्पुरत्या शहरातील सर्वच झोपडपट्ट्यांमध्ये तात्पुरती आरोग्य तपासणी केंद्र सुरू करावीत. जेणेकरून वेळेपूर्वीच संशयित रुग्णांना ओळखून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होईल, असेही ननावरे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.