Pimpri news: जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करा : जगताप

एमपीसी न्यूज – पीएमआरडीएचे पिंपरी-चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करावे.  रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी डिजीटल प्रिस्क्रिप्शन स्वीकारावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

आमदार जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडध्ये नेहरूनगर येथे पीएमआरडीएमार्फत जम्बो कोवीड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. परंतु, हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेले नाही. जम्बो कोवीड रुग्णालयात 800 बेड उपलब्ध असतील असे सांगण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

प्रत्यक्षात 550 बेड कार्यान्वित आहेत. हे रुग्णालय चालवणाऱ्या ठेकेदाराकडे वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे ते पूर्ण क्षमतेने सुरू करू शकले नाहीत. त्यामुळे अन्य एखाद्या ठेकेदारामार्फत उर्वरित बेड कार्यान्वित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणेत यावेत.

रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेले हेल्पलाइन क्रमांक चार-चार तास बिझी असतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. सध्याच्या गंभीर परिस्थितीत एक प्रकारे नागरिकांचा छळ करण्याचाच हा प्रकार आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कॉल सेंटरमार्फत आणखी तीन ते चार नंबर उपलब्ध करून देण्यात यावेत. जेणेकरून नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी नोंदवणे सहज शक्य होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.