Pimpri news: शहरातील अभ्यासिका, वाचनालये, ग्रंथालये सुरु करा; भाजयुमोची मागणी

Start Study rooms, Libraries in the city; demands BJYM.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या अभ्यासिका, वाचनालये, ग्रंथालये तातडीने सुरु करावीत अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने केली आहे.

युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेवून निवेदन दिले.

यावेळी महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल खाडे, प्रप्फुल थिटे, तेजस दरवडे, गणेश चव्हाण, अभिषेक हडवले आणि राज्य सेवा स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी)ची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

जवळपास या वर्षीच्या सुरुवातीपासूनच शहरातील सर्व अभ्यासिका, वाचनालये व ग्रंथालये बंदच होती. शहरातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत.

स्पर्धा परीक्षा जवळ आली आहे. काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे खासगी वाचनालयात किंवा अभ्यासकेंद्रात प्रवेश घेणे अशक्य आहे.

तसेच खासगी वाचनालय व अभ्यासकेंद्रातील जागा जवळपास पूर्ण भरलेल्या असल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुद्धा खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्ष्यात घेता आणि शासनाद्वारे हळूहळू सर्व गोष्टी सुरु होत असतांना वाचनालये व ग्रंथालये सुद्धा सुरु करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.