Pune : पुणे लघुपट महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात

एमपीसी न्यूज – नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही पुणेकर आणि मराठी चित्रपट परिवार संस्थांतर्फे ७ ते ९ जून या कालावधीत ९ व्या पुणे लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये विविध देशातील शंभरहून अधिक लघुपट दाखविण्यात येणार आहेत.

लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ७ जून रोजी सकाळी ११ वाजता ऑस्कर पुरस्कारांचे परीक्षक उज्वल निरगुडकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवामध्ये तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शंभरहून अधिक लघुपट दाखविण्यात येणार आहेत, अशी माहिती संयोजक हेमंत जाधव आणि समीर देसाई यांनी दिली.

महोत्सवाचे पारितोषिक वितरण ९ जून रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्हृयाचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे संचालक विकास पाटील, निर्माते वैभव जोशी,  निर्माते अनिल काकडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चित्रपट, दिग्दर्शक यासह तांत्रिक विभागातील मिळून विविध १२ विभागांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.