Pimpri : बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेला सुरूवात

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने अटल सन्मान योजनेअंतर्गत पिंपळेगुरव, नवी सांगवी आणि सांगवीमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नाने सुमारे एक हजार बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ होणार आहे.

या योजनेचा लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच मिळणार असल्यामुळे सर्व बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे आपल्या नावाची नोंद करावी, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. यावेळी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सांगर आंघोळकर, संतोष कांबळे, नगरसेविका माई ढोरे, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे,रावसाहेब चौगुले, जवाहर ढोरे, जयवंत शिंदे व बांधकाम कामगार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनिल कांबळे यांनी कष्ट घेतले.

केंद्र सरकारने बांधकाम कामगारांची ते काम करत असलेल्या परिसरात एक वेळचे जेवण देणारी योजना सुरू केली आहे. अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येतो. बांधकाम कामगारांची पोटाची भूक भागविणारी ही योजना चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रयत्न केले. त्यानुसार पिंपळेगुरव, नवी सांगवी आणि सांगवी परिसरात बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेला सुरूवात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like