Pune : सुखसागरनगर ते गुजरात कॉलनी नवीन बसमार्ग सुरू

एमपीसी न्यूज – गुजरात कॉलनी ते सुखसागरनगर ( बिबवेवाडी) असे दोन नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. या बसमार्गाचे उद्घाटन माहिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. हे मार्ग सुरू करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेववक पृथ्वीराज सुतार यांनी प्रयत्न केले.

डेपो मॅनेजर चंद्रकांत वर्पे, स्वारगेट डेपोचे नवनाथ बदे, मराठी भाषा संवर्धन समितीचे प्रा. आनिल गोरे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मैड आदी यावेळी उपस्थित होते.

सुतार म्हणाले, पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा संपूर्ण भार हा एकट्या पीएमपीएल’वर आहे. ‘पीएमपीएल’ ही सामान्यांना परवडणारी एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. पुणे शहराच्या लोकसंख्येच्या मानाने बसची संख्या कमी आहे. शहरातील वाहतूक समस्येवर बसची संख्या वाढविणे व बसच्या फेऱ्या वाढविणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

प्रा. अनिल गोरे म्हणाले, शिवसेना ही सामान्यांचे प्रश्न ओळखून प्रश्न पूर्णपणे सोडविला जात नाही तोपर्यंत पाठपुरावा करीत असते. शिवसेना पुणे शहरामध्ये लोकपरिषदेचे आयोजन करणार असून, या लोकपरिषदेमध्ये शहरातील नागरिकांना सहमागी करून शहरातील महत्त्वाचे सार्वजनिक प्रश्न काय आहेत, त्यांचा अग्रक्रम निश्चित करून ते प्रश्न संपूर्णपणे सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.