Vaccination News : आज पासून 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना प्रतिबंध लसीचा बूस्टर डोस

एमपीसी न्यूज – देशभरात लसीकरणाचा नवीन टप्पा आज (रविवार, दि. 10) पासून सुरु होत आहे. 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंध लसीचा बूस्टर डोस घेता येणार आहे. लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाल्यानंतर बूस्टर डोस घेता येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. हा बूस्टर डोस खाजगी रुग्णालयांमध्ये घेता येईल.

सुरुवातीला 60 वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर यांना 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 60 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरु झाले. लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मे 2021 पासून सुरु झाला. यात 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली. 1 जून पासून चौथा टप्पा सुरु झाला. यात 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरु झाले. आता 18 वर्षांवरील सर्वांना लसीचा बूस्टर डोस देखील घेता येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले.

कोविड प्रतिबंधक लसीकरणाला आणखी गती येण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना लसीच्या किमती परवडण्याच्या दृष्टीने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीच्या किमती कमी करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. सिरमने खाजगी रुग्णालयांसाठी  375 रुपयांनी लसीचे दर कमी केले आहेत. सिरमची कोविशिल्ड लस 225 रुपयांना मिळणार आहे. तसेच भारत बायोटेकने देखील कोवॅक्सिनच्या किमती कमी केल्या आहेत. भारत बायोटेकने 1200 रुपयांवरून 225 रुपयांवर लसीची किंमत आणली आहे. त्यामुळे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी खाजगी रुग्णालयात 225 रुपयांना मिळणार आहेत.

सिरम इंस्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

भारत बायोटेकच्या सुचित्रा एला यांनी देखील याबाबत ट्वीट केले आहे.

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसानंतर दुसरा डोस घेता येतो. तर कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेता येतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.