Free Vaccine : आजपासून देशात 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत लस 

एमपीसी न्यूज – भारतात आजपासून (21 जून) 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. 18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. 

21 जूनपासून देशातील सर्व राज्यातील 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला लस खरेदीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही. आतापर्यंत देशातल्या करोडो लोकांना मोफत लस मिळाली आहे. आता यात 18 वर्षांपुढील लोकंही समाविष्ट होतील, अशी घोषणा मोदी यांनी सात जूनला केलेल्या भाषणात केली.

‘केंद्र सरकार आजपासून प्रत्येक भारतीयासाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू करीत आहेत. भारतातील लसीकरण मोहिमेच्या या टप्प्यात देशातील गरीब जनता, मध्यम वर्ग तसेच युवक सर्वात मोठे लाभार्थी असणार आहेत. आपण सर्व भारतीयांनी लस घेऊया आणि सगळ्यांनी एकत्रितपणे कोरोनाला हरवू या,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 28 कोटी 36 हजार 898 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. रविवारी (दि.20) देशभरात 30 लाख 39 हजार 996 जणांना लस टोचण्यात आली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत 30 कोटी लसीचे डोस वितरीत केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.