State Corona Update : महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 82 हजारांवर ; 2739 नव्या रूग्णांची नोंद 

The number of corona victims in Maharashtra is over 82,000; Record of 2739 new patients

एमपीसी न्यूज – आज राज्यात 2739 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून  राज्यातील एकूण रुग्णसंख्या 82,968 झाली आहे. दिवसभरात सर्वाधिक 120 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 2234 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आज 2234 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 37 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे.

आज कोरोनाच्या 2739 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 82 हजार 968 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 600 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी 30 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 3 मे ते 3 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 90 मृत्यूपैकी मुंबई 53,मीरा भाईंदर 5, भिवंडी 3, ठाणे 9, उल्हासनगर 6, नवी मुंबई 6, सातारा 2, वसई विरार, अमरावती, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, सोलापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 37 हजार 124 नमुन्यांपैकी 82,968 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 46 हजार 566 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 29 हजार 98 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 82,968

मृत्यू – 2969

मुंबई महानगरपालिका- 47,354 (मृत्यू 1577)

ठाणे- 1065 (मृत्यू 21)

ठाणे महानगरपालिका- 4710 (मृत्यू 120)

नवी मुंबई मनपा- 3357 (मृत्यू 86)

कल्याण डोंबिवली- 1698 (मृत्यू 34)

उल्हासनगर मनपा – 415 (मृत्यू 15)

भिवंडी, निजामपूर – 247 (मृत्यू 11)

मिरा-भाईंदर- 902 (मृत्यू 35)

पालघर- 192 (मृत्यू 5 )

वसई- विरार- 1194 (मृत्यू 34)

रायगड- 722 (मृत्यू 29)

पनवेल- 689 (मृत्यू 26)

नाशिक – 217

नाशिक मनपा- 413 (मृत्यू 18)

मालेगाव मनपा – 782 (मृत्यू 68)

अहमदनगर- 141(मृत्यू 7)

अहमदनगर मनपा – 49 (मृत्यू 1)

धुळे – 79 (मृत्यू 11)

धुळे मनपा – 152 (मृत्यू 10)

जळगाव- 723(मृत्यू 96)

जळगाव मनपा- 240 (मृत्यू 13)

नंदुरबार – 40 (मृत्यू 4)

पुणे- 623 (मृत्यू 15)

पुणे मनपा- 8049 (मृत्यू 372)

पिंपरी-चिंचवड मनपा- 617 (मृत्यू 13)

सातारा- 626 (मृत्यू 27)

सोलापूर- 85 (मृत्यू 6)

सोलापूर मनपा- 1176 (मृत्यू 90)

कोल्हापूर- 613 (मृत्यू 6)

कोल्हापूर मनपा- 25

सांगली- 132 (मृत्यू 3)

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 13 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 113

रत्नागिरी- 352 (मृत्यू 10)

औरंगाबाद – 46 (मृत्यू 2)

औरंगाबाद मनपा – 1815 (मृत्यू 90)

जालना- 177 (मृत्यू 3)

हिंगोली- 206

परभणी- 53 (मृत्यू 3)

परभणी मनपा-25

लातूर -105 (मृत्यू 4)

लातूर मनपा- 30

उस्मानाबाद-118(मृत्यू 3)

बीड – 53 (मृत्यू 1)

नांदेड – 32 (मृत्यू 1)

नांदेड मनपा – 136 (मृत्यू 6)

अकोला – 50 (मृत्यू 6)

अकोला मनपा- 712 (मृत्यू 29)

अमरावती- 20 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 269(मृत्यू 16)

यवतमाळ- 160 (मृत्यू 2)

बुलढाणा – 86 (मृत्यू 3)

वाशिम – 9

नागपूर- 48

नागपूर मनपा – 690 (मृत्यू 11)

वर्धा – 9 (मृत्यू 1)

भंडारा – 39

चंद्रपूर -18

चंद्रपूर मनपा – 13

गोंदिया – 68

गडचिरोली- 41

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.