Maharashtra Corona Update : कोरोना बाधितांचा आकडा 80 हजार पार; आज 1475 रुग्ण कोरोनामुक्त

The number of corona victims in the state has crossed 80,000; Today 1475 patients are coronary free

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज 1475 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 35 हजार 156 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 2436 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 42 हजार 215 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सध्या राज्यात 46 शासकीय आणि 37 खाजगी अशा एकूण 83 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 5 लाख 22 हजार 946 नमुन्यांपैकी 80 हजार 229 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण 3827 एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण 2832 इतके आहे.

राज्यात 5 लाख 45 हजार 947 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 375 खाटा उपलब्ध असून सध्या 30 हजार 291 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 139 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- 93 (मुंबई 54, ठाणे 30, वसई विरार 1, कल्याण डोंबिवली 7, भिवंडी 1), नाशिक- 24 (जळगाव 14, नाशिक3, मालेगाव 8), पुणे- 16 (पुणे 14, सोलापूर 2), कोल्हापूर- 5 (रत्नागिरी 5) औरंगाबाद- 8 (औरंगाबाद 5, जालना 1, परभणी 2), लातूर- 3 (लातूर 1, उस्मानाबाद 1, नांदेड 1), औरंगाबाद-1.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 75 पुरुष तर 64 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 139 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 78 रुग्ण आहेत तर 53 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 8 जण 40 वर्षांखालील आहे. या 139 रुग्णांपैकी 110 जणांमध्ये (79 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2849 झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 27 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू 21 एप्रिल ते 2 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 112 मृत्यूंपैकी मुंबई 41, जळगाव -13, ठाणे 30, कल्याण डोंबिवली- 7, मालेगाव -8 , रत्नागिरी – 5, पुणे- 3, भिवंडी – 1, सोलापूर – 2, नाशिक 2 असे मृत्यू आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (46,080), बरे झालेले रुग्ण- (18,778), मृत्यू- (1519), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(6), ॲक्टिव्ह रुग्ण- (25,768)

ठाणे: बाधित रुग्ण- (11,877), बरे झालेले रुग्ण- (4445), मृत्यू- (292), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (7140)

पालघर: बाधित रुग्ण- (1285), बरे झालेले रुग्ण- (468), मृत्यू- (37), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (780)

रायगड: बाधित रुग्ण- (1362), बरे झालेले रुग्ण- (704), मृत्यू- (55), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (601)

नाशिक: बाधित रुग्ण- (1367), बरे झालेले रुग्ण- (978), मृत्यू- (81), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (308)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (188), बरे झालेले रुग्ण- (76), मृत्यू- (8), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (104)

धुळे: बाधित रुग्ण- (195), बरे झालेले रुग्ण- (102), मृत्यू- (21), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (72)

जळगाव: बाधित रुग्ण- (896), बरे झालेले रुग्ण- (374), मृत्यू- (109), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (413)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (40), बरे झालेले रुग्ण- (28), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (8)

पुणे: बाधित रुग्ण- (9051), बरे झालेले रुग्ण- (4893), मृत्यू- (390), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (3768)

सोलापूर: बाधित रुग्ण- (1217), बरे झालेले रुग्ण- (572), मृत्यू- (94), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (551)

सातारा: बाधित रुग्ण- (587), बरे झालेले रुग्ण- (250), मृत्यू- (22), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (315)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (630), बरे झालेले रुग्ण- (303), मृत्यू- (6), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (321)

सांगली: बाधित रुग्ण- (136), बरे झालेले रुग्ण- (79), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (53)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (105), बरे झालेले रुग्ण- (17), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (88)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (344), बरे झालेले रुग्ण- (129), मृत्यू- (10), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (205)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (1781), बरे झालेले रुग्ण- (1148), मृत्यू- (90), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (543)

जालना: बाधित रुग्ण- (170), बरे झालेले रुग्ण- (78), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (89)

हिंगोली: बाधित रुग्ण- (205), बरे झालेले रुग्ण- (146), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (59)

परभणी: बाधित रुग्ण- (77), बरे झालेले रुग्ण- (45), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (29)

लातूर: बाधित रुग्ण- (132), बरे झालेले रुग्ण- (83), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (45)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (106), बरे झालेले रुग्ण- (53), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (50)

बीड: बाधित रुग्ण- (51), बरे झालेले रुग्ण- (38), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0),ॲक्टिव्ह रुग्ण- (12)

नांदेड: बाधित रुग्ण- (162), बरे झालेले रुग्ण- (102), मृत्यू- (7), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (53)

अकोला: बाधित रुग्ण- (727), बरे झालेले रुग्ण- (405), मृत्यू- (33), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (288)

अमरावती: बाधित रुग्ण- (275), बरे झालेले रुग्ण- (164), मृत्यू- (16), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (95)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (160), बरे झालेले रुग्ण- (104), मृत्यू- (2), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (54)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (82), बरे झालेले रुग्ण- (48), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (31)

वाशिम: बाधित रुग्ण- (9), बरे झालेले रुग्ण- (6), मृत्यू- (2), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1)

नागपूर: बाधित रुग्ण- (681), बरे झालेले रुग्ण- (411), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (259)

वर्धा: बाधित रुग्ण- (9), बरे झालेले रुग्ण- (6), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2)

भंडारा: बाधित रुग्ण- (38), बरे झालेले रुग्ण- (14), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (24)

गोंदिया: बाधित रुग्ण- (68), बरे झालेले रुग्ण- (50), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (18)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (30), बरे झालेले रुग्ण- (25), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (5)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (41), बरे झालेले रुग्ण- (25), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (16)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (65), बरे झालेले रुग्ण- (0), मृत्यू- (18), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (47)

एकूण: बाधित रुग्ण-(80,229), बरे झालेले रुग्ण- (35,156), मृत्यू- (2849), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(9),ॲक्टिव्ह रुग्ण-(42,215)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3479 झोन क्रियाशील असून आज एकूण 18 हजार 026 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 69.18 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.