State Excise Department Action : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावर पकडले गोव्यातील दारूने भरलेले दोन कंटेनर

60 लाखांच्या दारुसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – गोवा राज्य निर्मित व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या दोन कंटनेरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department)  कारवाई करून 59 लाख 60 हजार 400 रुपयांच्या विदेशी मद्य जप्त केले तसेच याप्रकरणी दोन जणांना अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 5) सोमाटणे फाटा व तळेगाव टोलनाका येथे करण्यात आली.

जयकिसन धीमाराम ढाका आणि सुजानाराम जियाराम बिष्णोई (दोघे रा. बाडमेर, राजस्थान) या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Hunger Strike Against RFD : पुण्यातील नद्या वाचविण्यासाठी साखळी उपोषणाचे 100 दिवस पूर्ण

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) पिंपरी-चिंचवडचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मद्यसाठा घेऊन पुणे-मुंबई महामार्गावरून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार, मुंबई-बंगळूर महामार्गावर सोमाटणे फाटा बाह्यवळण व तळेगाव टोलनाका या परिसरात सापळा लावण्यात आला. संशयावरून दोन कंटेनरची तपासणी करण्यात आली. गोवा राज्य निर्मित व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याचा 59 लाख 60 हजार 400 रुपये किमतीचा साठा या ट्रक कंटेनरमध्ये सापडला.

मॅकडॉल नंबर 1 व्हिस्की, टुबर्ग स्ट्रॉग बिअर, आईस मॅजिक व्होडका, अँड्रीयल व्होडका, रॉयल ब्लु व्हिस्की या विदेशी मद्याचे एकूण 1006 बॉक्स मिळून आले. दारू तसेच वाहन असा एकूण 87 लाख 60 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई), 81, 83 व 90, 103 व 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तळेगाव दाभाडे येथील निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, एम. आर. राठोड, दीपक सुपे व स्वाती भरणे, कर्मचारी भागवत राठोड, अक्षय म्हेत्रे, राहुल जौंजाळ, रसुल काद्री, चंद्रकांत नाईक, सुरज घुले, मुंकूंद पोटे, जयराम काचरा यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.