Holi Guidelines : होळी साजरी करा, पण…; राज्य शासनाची नियमावली जाहीर

एमपीसी न्यूज – होळी आणि धुलीवंदन साजरे करा; पण नियमाच्या अधीन राहून, अशा आशयाच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. कोरोना साथीत घातलेले निर्बंध शासनाकडून कमी केले जात आहेत. त्यामुळे नागरिक पुन्हा न्यू नॉर्मल होण्याचा आनंद घेत आहेत. त्यातच होळी आणि धुलीवंदन हा आनंदाचा सण म्हटला की नागरिकांच्या आनंदाला पारावर राहत नाही. मात्र हा सण साजरा करताना नागरिकांना काही नियम पाळावे लागणार आहेत. त्याबाबत राज्य शासनाने आदेश दिले आहेत.

राज्यात होळी गुरुवारी (दि. 17) तर धुलीवंदन शुक्रवारी (दि. 18) होणार आहे. दोन्ही दिवस सणाची लगभग सुरु राहील. त्यात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे तसेच सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा देखील सुरु आहेत. त्यामुळे परीक्षेला जाणा-या विद्यार्थ्यांच्या अंगावर रंग टाकू नये. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र ही साथ अजून पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे सामाजिक अंतर, मास्क अशा बाबींचे पालन करावे लागणार आहे.

शासनाने दिलेल्या आदेशात नेमकं काय म्हटले आहे?

  • रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक असेल. डीजे लावण्यास बंदी असेल. डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन करू नये. असे वर्तन करताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे.
  • महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी, असेही शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लाऊ नये. अन्यथा कारवाई होईल.
  • कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये. धुळवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये, असे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.