Maharashtra Political Crises : राज्य सरकार डळमळीत! शहर शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये सन्नाटा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crises) भूकंप आणणाऱ्या शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता दर तासाला वेगवेगळे वळण लागताना दिसत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार डळमळीत झाले आहे. या बंडामुळे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये सन्नाटा आहे. सरकार राहणार की जाणार याची चिंता पदाधिका-यांना आहे. तर, दुसरीकडे शहर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे धक्के राज्यातील सर्वच जिल्ह्यात बसले आहेत. पण, पुणे, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचडमध्ये कोणतीही अस्थवस्थता नाही. कारण, पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघापैकी शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे बंडाचा परिणाम पुणे जिल्ह्यावर झाला नाही. पण, शिवसैनिकांमध्ये शांततेचे वातावरण आहे. कोणीही यावर बोलत नाही. सर्वांनी मौन पाळले आहे. सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे.

PDFA LEAGUE : महिला सुपर सिक्समध्ये पुणेरी वॉरियर्सची विजयी सलामी

एकनाथ शिंदे यांनी बंड थंड करुन येण्यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्न करत आहेत. पण, कालपासून आत्तापर्यंत शिंदे यांचे मन वळविण्यात यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारही डळमळीत आले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोंडीचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या (Maharashtra Political Crises) दिशेने चालला असल्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे विधानसभा बरखास्त होईल किंवा शिंदे गटाच्या सहकार्याने भाजप सरकार स्थापन करेल अशी शक्यता आहे.

Uddhav Thackeray Address Highlights : बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी… उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

राज्यातील या घडामोंडीमुळे शहर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये शांतता आहे. सरकार पडल्यास महापालिका निवडणुकीला कसे होईल, याची चिंता या पदाधिका-यांना सतावत आहे. तर, राज्यातील या घडामोडी पाहता पुन्हा भाजपचे सरकार येण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने शहर भाजपमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.