Pimpri News : राज्य शासनाचे एमआयडीसीकडे, उद्योजकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष – अभय भोर

एमपीसी न्यूज – राज्य शासनाचे पिंपरी-चिंचवड एमआयडीसीकडे, उद्योजकांच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. एमआयडीसी विभाग फक्त पाणीपुरवठा नियोजनाकडेच लक्ष देताना दिसते. परंतु मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून त्याबाबत पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर म्हणाले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात भोर यांनी म्हटले आहे की, एमआयडीसीने लीज डीडवर जागा दिलेल्या आहेत. परंतु, या जागा देताना उद्योगांसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा निर्माण करणे हे एमआयडीसीचे काम होते. उद्योजकांनी महापालिकेकडे मागणी न करता एमआयडीसीने पालिकेकडे पाठपुरावा करून सदर सुविधा निर्माण करून देणे ही एमआयडीसीची जबाबदारी आहे.

एमआयडीसीने महापालिका रस्ते हस्तांतर केले असून बाकी सुविधा देण्याचे प्रयत्न एमआयडीसीकडून होतच नाहीत. पिंपरी- चिंचवड एमआयडीसी क्षेत्र तीन ते साडेतीन हजार एकरवर विस्तारित असून क्षेत्रामध्ये अनेक नामांकित कंपन्या गेले पन्नास वर्षापासून आहेत. परंतु, राज्यात नवीन एमआयडीसी निर्माण करण्याकडे सरकारचा भर जास्त असून जुन्या एमआयडीसी निर्माण करून बेवारसपणे सोडून गेलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक उद्योग हे स्थलांतरित होत असून बहुत सुविधा अक्षरशः विकत घ्यावे लागतात.

एमआयडीसीचे एमआयडीसीकडे लक्ष नाही. फक्त पाणी पुरवठा करण्याचे काम एमआयडीसीकडे आहे. मूलभूत सुविधांची मागणी केल्यास महापालिकेकडे बोट दाखविले जाते आणि महापालिका मोठ्या प्रमाणात कर वसूल करत असली तरी आमचे काम नसल्याचे बोलून सारवासारव करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक बजेट मध्ये देखील जुन्या एमआयडीसीसाठी कोणत्या स्वरूपाची तरतूद केल्याचे आतापर्यंत चाळीस वर्षात दिसून आले नाही. उद्योजक गप्प बसून बुक्क्याचा मार सहन करत असल्याचे दिसून येते. राज्य सरकारकडे एमआयडीसीच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केलेली आहे. यावर त्वरित निर्णय व बैठक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.