Pune News : मंथन फाउंडेशनला राज्यस्तरीय एड्स जनजागरण पुरस्कार

एमपीसी न्यूज : स्व. रोहिणी रविंद्र जाधव स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून रौप्य महोत्सवी पुरस्कार प्रदान सोहळाचे आयोजन केले होते. संस्थेतर्फे 1996 पासून एड्स जनजागृतीसाठी विविध मार्गाने प्रबोधन करणाऱ्या तसेच एचआयव्ही एड्स संक्रमित व्यक्तींसाठी मदत करणाऱ्या संस्थेला पुरस्कार दिला जातो.
यावर्षी 6 मार्च 2021 रोजी राज्यस्तरीय पुरस्काराचा बहुमान मंथन फाउंडेशन ला मिळाला. डॉ. इंद्रजितजी देशमुख, ज्येष्ठ विचारवंत व माजी सनदी अधिकारी यांच्यहस्ते मंथन फाउंडेशन च्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी पुरस्कार स्वीकारला.
यावेळ मंथन फाउंडेशन अध्यक्षा ,आशा भट्ट म्हणाल्या,” मार्च 2010 पासून संस्था आरोग्य, एचआयव्ही एड्स जागृतीवर काम करत आहे. यात मुख्यतः देह विक्रय करणाऱ्या महिला, तृतीय पंथी, MSM, स्थलांतरित कामगार वर्ग, ट्रक ड्रायव्हर यांच्या सोबत काम करत आहोत.

त्याच बरोबर एचआयव्ही सह जगत असलेल्या व्यक्तींच्या हक्कांसाठी, तसेच समाजात मिळणारी वागणूक, आहार, ए.आर. टी औषधे वेळेवर व नियमित खावी, नियमित तपासणी करावी यासाठी काम करत आहे. लॉकडाउन मध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले, घरपोच औषधे देण्यासाठी मदत केली. मंथन फाउंडेशन तर्फे एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांसाठी देखील त्याच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आरोग्य, सामाजिक प्रश्नावर संस्था काम करत आहे.
भविष्यात अजुन खूप उल्लेखनीय कामे करण्यासाठी हा पुरस्कार म्हणजे आपण दिलेली जबाबदारी आहे व ते आम्ही नक्की पूर्ण करू.” यावेळी राज्यस्तरीय रक्तमित्र पुरस्कार, एड्स जनजागृती पुरस्कार, निसर्ग पर्यावरण मित्र पुरस्कार , रक्तदाता पुरस्कार असे 4 पुरस्कार दिले गेले.
कार्यक्रमाला स्व. रोहिणी रविंद्र जाधव ट्रस्ट चे अध्यक्ष रवींद्र जाधव, कार्याध्यक्ष ऍड. अशोक मुनोत , डॉ. राजेंद्र माने, डॉ. प्रमेकुमार भट्टड, माधवी भट्ट, अद्विका वेलणकर, वासुदेव काळे आदी उपस्थित होते.