Sports News : राज्यस्तरीय विभागीय कबड्डी पंच शिबिरास पिंपरीत सुरुवात

एमपीसी न्यूज – येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व भिकू वाघिरे पाटील प्रतिष्ठान व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने विभागीय कबड्डी पंच शिबीराला शनिवारी (ता.27) सुरुवात झाली.

हे शिबिराचे आयोजन 27 व 28 ऑगस्ट हे दोन दिवस होणार आहे.या शिबीरात पुणे विभागातील पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व नगर या जिल्ह्यांतील पंचांनी सहभाग घेतला आहे.या शिबीरात सामन्यातील विविध निर्णयात एक वाक्यता यावी नवीन नियमांबाबत चर्चा व समस्यांची सोडवणूक या बाबत चर्चा करण्यात येणार आहे.

या शिबारीचे उद्घाटन पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघिरे, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सदस्य बाबुराव चांदेरे, महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच मंडळाचे अध्यक्ष विश्वास मोरे, सचिव आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे, पंच मंडळाचे सदस्य अजित पाटील, लक्ष्मण बेल्लाळे, सुहास पाटील,सूर्यकांत देसाई, रोहिणी अरगडे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह राजेंद्र आंदेकर, पंच मंडळाचे अध्यक्ष संदिप पायगुडे, सहकार्यवाह योगेश यादव, नवमहाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलास जगदाळे, कार्य़ालयीन अधिक्षक रत्नप्रभा नाईक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.