Pimpri : प्रदेशाध्यक्ष आले अन्‌ गेले; वातावरणनिर्मिती न झाल्याने भाऊंनी कार्यकर्त्यांना झापले!

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार संघटनात्मक आढावा बैठका घेण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. पंरतु, वातावरण निर्मिती झाली नाही. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्यांना फैलावर घेतला. 

चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचा आढावा दानवे यांनी घेतला. तथापि, प्रदेशाध्यक्ष शहरात येऊन देखील भाजपमय वातावरण झाले नव्हते. प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताचे फलक लावले नव्हते. ज्या कार्यकर्त्यांकडे वातावरण निर्मितीची जबाबदारी दिली होती. त्यांनी ती पार पडली नाही. त्यामुळे फलक लागले नाहीत. केवळ वाल्हेकरवाडी परिसरातच फलक लागले होते.

पिंपरी, चिंचवड परिसरात फलक लागले नव्हते. यावरुन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्यांना बैठकीच्यास्थळीच फैलावर घेतले. ‘वातावरण चांगले भाजपमय झाले. तुम्ही सोपविलेली जबाबदारी पार पाडली’, असे उपरोधिक बोलत कार्यकर्त्यांना फैलावर घेतले. त्यावर त्या कार्यकर्त्याने माझ्याकडे जबाबदारी नव्हती. जबाबादारी दुस-याकडे होती, असे उत्तर दिले. त्यावर संतापलेल्या आमदारांनी पुन्हा त्या कार्यकर्त्याला खडेबोल सुनावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.