Chinchwad : राज्यस्तरीय विशेष सावित्री ज्योत पुरस्कार चिंचवडच्या शोभा निसळ यांना प्रदान

एमपीसी न्यूज –  नुकतेच ‘महाराष्ट्र राज्य जय युवा अकॅडमी’ अहमदनगर यांचे राज्यस्तरीय चौथे लोककला महोत्सव २०१९ अहमदनगर येथील  लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे  झाले.

या महोत्सवात चिंचवडच्या प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा शोभा निसळ यांनी त्यांची लोककला सादर केल्याबद्दल व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्ल प्रमाणपत्र  देण्यात आले.  विशेष राज्यस्तरीय सावित्री ज्योती पुरस्कार ‘प्रसिद्ध नाट्यकलावंत व टि. व्ही. मालिकेतील ‘तुलां पाहते रे’, ‘झी गौरव पुरस्कार’ विजेते मोहनीराज गटणे यांच्या हस्ते देण्यात आला.

राज्यस्तरीय विशेष पुरस्काराचे स्वरूप गौरव चिन्ह, सन्मान पत्र, व पैठणी असे असून पुरस्कारासाठी शोभा निसळ यांचे सर्व क्षेत्रांत अभिनंदन होत आहे. या प्रसंगी दैनिक लोकमंथनचे संपादक अशोक सोनवणे, सिने अभिनेत्री प्रियंका ससाणे, रयत शिक्षण प्रतिष्ठान जेऊर अहमदनगरचे सचिव  आदी  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.