मंगळवार, जानेवारी 31, 2023

Bhor News: राज्य परिवहन महामंडळाच्या भोर येथील आगार व्यवस्थापक व चालकाला 4000 रुपयांची लाच स्विकारल्याने अटक

एमपीसी न्यूज : राज्य परिवहन महामंडळाच्या भोर येथील आगार व्यवस्थापक व चालकाला 4000 रुपयांची लाच स्विकारल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी आज सोमवार, डिसेंबर 5 रोजी अटक करण्यात आले आहे.

Saswad news: दत्तजयंती निमित्त सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने

यबाबत 49 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे. याप्रकरणी युवराज कदम, वय 52 वर्षे हे वर्ग 2 चे अधिकारी असून राज्य परिवहन महामंडळाच्या तालुका भोर येथील आगार व्यवस्थापक आहेत. तसेच विजय राऊत, वय 51 वर्षे, हे वर्ग 3 चे कर्मचारी असून राज्य परिवहन महामंडळाच्या तालुका भोर येथील चालक आहेत. कदम व राऊत यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते व अटक केले आहे.

त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7, 2 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भोर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे चालू आहे

Latest news
Related news