Youth congress protest : विद्यापीठाच्या पैशातून संसारोपयोगी साहित्याची खरेदी, कुलगुरूंच्या विरोधात प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन 

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या घरातील भांडी व संसारोपयोगी साहित्याच्या खरेदी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे (Youth congress protest) निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील भ्रष्ट कारभार, बेकायदेशीर पद्धतीने केलेली भांडी, पडदे व इतर संसारोपयोगी साहित्याची खरेदी याचा निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश आबनावे, अक्षय जैन, उमेश पवार, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ आमराळे, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, महासचिव अनिकेत नवले, रोहन सुरवसे पाटील आदी उपस्थित होते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या पुणे शाखेतर्फे परिसंवादाचे आयोजन

कुलगुरूंच्या संसारोपयोगी वस्तू विद्यापीठाच्या पैशातून खरेदी केल्या आहेत.(Youth congress protest) घरातील कुकर, मिक्सर, डायनिंग टेबल, पडदे, सोफासेट अशा छोट्या-मोठ्या 92 वस्तू खरेदीसाठी विद्यापीठाच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. तसेच विद्यापीठाच्या कारभाराविरुद्ध माहिती अधिकारात माहिती मागून दिली जात नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आणि कुलगुरूंच्या प्रभारी कुलगुरूंच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.