Vadgaon Maval News : पोल्ट्री फार्मरच्या प्रलंबित मागण्यांचे जिल्हा पशुसंवर्धन अधिका-यांना निवेदन

एमपीसी न्यूज – मावळ तालुका पोल्ट्री संघटनेच्या वतीने पोल्ट्री फार्मरच्या प्रलंबित मागण्यांचे लेखी निवेदन पुणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे यांना गुरूवारी (दि 19)  देण्यात आले. पोल्ट्री फार्मरच्या सर्व मागण्या समजून घेत फार्मर्सना न्याय देण्याचे आश्वासन मुकणे यांनी दिले.

यावेळी संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे गुरूजी,अध्यक्ष एकनाथ गाडे,कार्याध्यक्ष  सुभाष केदारी, सचिन आवटे, प्रविण शिंदे, विनायक बधाले आदी उपस्थित होते.

संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात पोल्ट्रीवरील टॅक्स रद्द करावा,पक्षी संवर्धन मुल्य वाढवून मिळावे, लिफ्टिंग रेट  वाढवावा, कंपन्यांनी फार्मर बरोबरचा करार मराठीत करावा. फार्मरचे पेमेंट 15 दिवसाचे आत मिळावे. शेडवर मार्गदर्शनासाठी सुपरवायझर दररोज  पाठवावा. लाॅट फेल गेल्यास 75 टक्के  नुकसान भरपाई दिली जावी. आदी प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी उपायुक्त मुकणे यांनी सर्व मागण्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. फार्मरसना दिलासा देणारा न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.