Station Master : देशातील 35 हजार स्टेशन मास्टर 31 मे राेजी रजेवर

एमपीसी न्यूज : रेल्वेचे खासगीकरण (Station Master) व काॅर्पारेटायझेशन बंद करा, पदनाम बदलासह संवर्गाचे वर्गीकरण करावे, स्टेशन मास्टरांच्या रिक्त जागा तात्काळ भरा, स्टेशन मास्टरांना सुरक्षा व ताण भत्ता द्या, नवीन पेन्शन याेजना रद्द करुन जुनी पेन्शन याेजना लागू करा, रात्रपाळी सिलींग मर्यादा 43 हजार 600 रुपयांचा आदेश रद्द करुन 1 जुलै 2017 पासूनचा रिकवरी आदेश परत घ्या, एम.ए.सीपी. चा फायदा 1 जानेवारी 2016 पासून द्या; आदी मागण्यांकरिता देशभरातील 35 हजार स्टेशन मास्टर 31 मे राेजी एक दिवसाची सामूहिक रजा घेणार आहेत; अशी माहिती ऑल इंडिया स्टेशन मास्टर असाेसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी एस्मा संघटनेचे विभागीय सचिव विश्वजीत किर्तीकर, मध्य रेल्वे झोनल सचिव एस.के.मिश्रा, सुनील मध्य रेल्वे झोनल कार्याध्यक्ष अजय सिन्हा, स्टेशन प्रबंधक दिनेश कांबळे उपस्थित हाेते.
चंद्रात्रे म्हणाले , रेल्वे स्टेशन मास्टरांच्या (Station Master) प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी यापूर्वी पाच टप्प्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करुनही अद्याप रेल्वे बाेर्डाने गांभीर्याने मागण्यांचा विचार केला नसल्याचे दिसून येत आहे. रेल्वे बाेर्डाच्या अधिकाऱ्यांना ईमेल पाठविण्यात आले, रात्रीच्या पाळीवरील स्टेशन मास्तरांनी मेणबत्त्या पेटवल्या, एक आठवडा काळा बिल्ला लावून अंदोलन केले, एक दिवसाचा उपवास केला, प्रत्येक विभागीय कार्यालया समाेर रेल्वेचे कामकाज सुरळित ठेवण्यासाठी निर्देशने करण्यात आलेली आहे.
स्टेशन मास्टरांची रात्रपाळी सिलिंग लिमिट हटविण्याचा आदेश रेल्वे बाेर्ड द्वारे स्विकारुन ताे डीओपीटीला पाठविण्यात आला. परंतु,  डीओपीटी कडून अद्याप संबंधित आदेश वित्त विभागास पाठविण्यात आलेला नाही. रात्रपाळी करुनही स्टेशन मास्टरांना त्यांचे अधिकार मिळत नाही. आगामी काळात रेल्वे प्रशासनाने याेग्य प्रकारची भूमिका न घेतल्यास अंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वे प्रशासनावर राहिल; असा इशारा यावेळी देण्यात आला.
https://www.youtube.com/watch?v=HoQRcW2NMAI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.