BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून लॅपटॉप चोरी 

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करून चोरटयाने घरातून लॅपटॉप चोरून नेला. ही घटना जुनी सांगवी येथे घडली. महेश तुकाराम चौधरी(वय 23, रा. मधुबन कॉलनी, गल्ली नं. 2 जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान फिर्यादी चौधरी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्यांनी आत प्रवेश करून आतील 25 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. महिला सहायक निरीक्षक गवळी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

.