सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Snooker Championship : शिवम अरोरा, अमी कमानी, तन्मय जतकार, इशप्रित चढ्ढा, हसन बदामी, फैझल खान, क्रिश गुरबक्शानी यांची आगेकूच

एमपीसी न्यूज –  द क्यु क्लब तर्फे आयोजित स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद (Snooker Championship) स्पर्धेत शिवम अरोरा, अमी कमानी, तन्मय जतकार, इशप्रित चढ्ढा, हसन बदामी, फैझल खान, क्रिश गुरबक्शानी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली.

वडगांव-शेरी येथील द क्यु क्लबमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या गटसाखळी फेरीत फ गटाच्या सामन्यात अमी कमानी याने विशाल रजानी याचा 77-02, 108-08, 60-57 असा पराभव केला. आपल्या या विजयात अमी याने दुसर्‍या फ्रेममध्ये 62 गुणांचा बे्रेकही नोंदविला. याच गटाच्या सामन्यात राष्ट्रीय खेळाडू शिवम अरोरा याने रफत हबीब याचा 28-65, 90-30, 50-46, 70-08 असा पराभव करून आगेकूच केली.

ज गटाच्या सामन्यात क्रिश गुरबक्शानी याने सिद्धार्थ पारेख याचा 76-43, 88-51, 69-62 असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात फैझल खान याने अनुज उप्पल याचा 60-55, 56-11, 53-35 असा पराभव करून ह गटात आगेकूच केली.

अतितटीच्या झालेल्या सामन्यात तन्मय जतकार याने आर. गिरीष याचा 51-46, 24-90, 11-56, 69-22, 62-05 असा पराभव केला. अ गटाच्या सामन्यात इशप्रित चढ्ढा याने साद सय्यद याचा 40-73, 28-69, 77-36, 80-48, 68-48 असा पराभव केला. ई गटाच्या सामन्यात हसन बदामी याने के. वैंकशेटम याचा 83-08, 06-76, 71-17, 31-62, 75-67 असा पराभव करून आगेकूच केली.

सामन्यांचे निकालः मुख्य ड्रॉः गटसाखळी फेरीः Snooker Championship
गट फः शिवम अरोरा वि.वि. रफत हबीब 28-65, 90-30, 50-46, 70-08;
गट फः अमी कमानी वि.वि. विशाल रजानी 77-02, 108(62)-08, 60-57;
गट बः तन्मय जतकार वि.वि. आर. गिरीष 51-46, 24-90, 11-56, 69-22, 62-05;
गट अः इशप्रित चढ्ढा वि.वि. साद सय्यद 40-73, 28-69, 77-36, 80-48, 68-48;
गट ईः हसन बदामी वि.वि. के. वैंकशेटम 83-08, 06-76, 71-17, 31-62, 75-67;
गट हः फैझल खान वि.वि. अनुज उप्पल 60-55, 56-11, 53-35;
गट जः क्रिश गुरबक्शानी वि.वि. सिद्धार्थ पारेख 76-43, 88-51, 69-62;

spot_img
Latest news
Related news