Somatane Toll Naka : सोमाटणे टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना सूट मिळण्याबाबत होणार स्टिकरचे वाटप

एमपीसी न्यूज – सोमाटणे टोल नाक्यावर (Somatane Toll Naka) स्थानिक वाहनांना सूट मिळण्यासाठी येत्या 15 दिवसात स्टिकर वाटप केले जाणार आहेत. सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन सोमाटणे येथील टोलनाका बंद करण्याच्या मागणीचा विषय राज्याच्या कॅबिनेटपर्यंत पोहोचवणार असल्याचे जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी न्यायालयीन लढाई देखील सुरू असल्याचे आवारे म्हणाले.

राज्याच्या कॅबिनेट मध्ये टोल हटाव बाबत मागणी करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेणार, जोपर्यंत बेकायदा सोमाटणे टोल हटवला जाणार नाही तोपर्यंत सर्वपक्षीय लढा सुरूच राहणार, न्यायालयीन लढाई सुरू असल्याने पोलीस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार स्थानिक वाहनधारकांना टोल मधून सूट मिळण्यासाठी 15 दिवसात  टोल सुटचे स्टिकर वाटप करण्यात येणार आहे, अशी घोषणा समितीच्या वतीने जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील एमराल्ड हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि.10) आवारे बोलत होते.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक समीर खांडगे, अमोल शेटे, मिलिंद अच्युत, मुन्ना मोरे, सुनील पवार, अनिल भांगरे, कल्पेश भगत, आशिष खांडगे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दि. 07 मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, सहाय्यक उपायुक्त नंदकिशोर भोसले, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत तसेच एम एस आर डी सी कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे, आयआरबी मुख्य नियंत्रक के बी फंड, सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या समवेत बैठक झाली.

यात 15 दिवसात मावळ वाशीयांना टोलमधून (Somatane Toll Naka) सूट देण्यासाठी पास स्टिकर देण्याचा निर्णय झाला. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमाटणे टोलनाका हटवण्या बाबत सर्व पक्षिय कृती समितीचे  दि. 16 एप्रिल रोजी जन आंदोलन करण्यात आले होते. परंतु सदरचा टोलनाका हटवण्याबाबत काहीच कार्यवाही व निर्णय न झाल्याने दि. 10/05/2022 रोजी पासुन सर्व पक्षिय कृती समिती यांनी सोमाटणे टोलनाक्याच्या समोर ठिया आंदोलनाचा निर्णय घेतला होता.

(दि 10) रोजी पासुन सर्व पक्षिय कृती समिती यांनी आयोजलेल्या ठिया आंदोलनाचे संबंधाने (दि 07 मे) रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली. नागरीकांना टोल भरण्यामध्ये सूट देण्यासाठी स्थानिक असल्याची खात्री करुन वाहनांना स्टीकर वाटप करण्याचे ठरले व स्टीकर धारकांना टोल आकारण्यात येवु नये असा निर्णय हा त्वरित मान्य करण्यात आला होता. टोल नाक्यावर तशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

बेकायदा टोल (Somatane Toll Naka) हटविल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा सर्व पक्षीय एकमुखाने निर्णय झाला. टोल हटविण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असे आवाहन सर्वांनी केले. टोल मधून सूट या मागणीवर थांबणार नाही. या आंदोलनाला मावळ तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन कल्पेश भगत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.