BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : पिस्तुलाचा धाक दाखवून हॉटेलमधून रोकड चोरली

एमपीसी न्यूज – पिस्तुलाचा धाक दाखवून हॉटेलच्या काउंटरमधून रोकड चोरून नेली. तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास मेदनकरवाडी येथील हॉटेल शिवराज मध्ये घडली.

काळूराम आनंदा खंडेभराड (वय 44, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल माऊली लष्करे, अमोल विनायक ओव्हाळ, संतोष ननावरे (तिघे रा. कडाचीवाडी, ता. खेड) आणि अन्य एक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळूराम यांचे मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत शिवराज हॉटेल आहे. शनिवारी रात्री ते त्यांच्या हॉटेलवर होते. त्यावेळी आरोपींनी हॉटेलमध्ये येऊन काळूराम यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्या धाकाने हॉटेलच्या काउंटर मधील 9 हजार 860 रुपयांची रोकड आरोपींनी काढून घेतली. तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून हॉटेलचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3