Pune : चोरीची फॉर्च्यून बनावट कागदपत्र तयार करून विक्री प्रकरणतील दोघेजण जेरबंद

एमपीसी न्यूज – फॉर्च्यून गाडी चोरी करून बनावट कागदपत्र तयार करून विक्री केल्या प्रकरणी दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. युनिट एकच्या पोलिसांनी सापळा रचून आज (गुरुवार) ही कारवाई केली.  

नावेद शमीम शेख (वय 30 रा. गुलबर्गा, कर्नाटक), मजहर बीलाल शेख (रा. सोलापूर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर मतीन शेख (रा. कोंढवा) यांचा चारचाकी वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना  आरोपी नावेद शेख व ईश्वर पाटे अशी नावे सांगून फॉर्च्यूनर गाडीची बनावट कागदपत्रे देऊन त्यांच्याकडून गाडीच्या व्यवहाराचे 13 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली, असा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल होता.या गुन्ह्याचा तपास करीत असताना या गाडीबाबत कलंगुट पोलीस ठाणे गोवा येथे गाडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास करीत असताना त्यांना या गुन्ह्यातील आरोपी कोंढवा भागात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, नावेद आणि मजहर हे कोंढवा येथे आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून 15 लाख रुपये किमतीची फॉर्च्यून गाडी जप्त करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.