Pune : दुकानाचे शटर उचकटून किमती वस्तूंची चोरी

एमपीसी न्युज –  एनआयबीएम रोड येथील फिरोज रजपूत (वय 38, शिवाजीनगर) यांच्या दुकानाचे शटर उचकटून तीन अज्ञात इस्मानी दुकानातील तब्बल 88 हजार 684 रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. ही घटना काल बुधवारी पहाटे (दिनांक 15) 3 च्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार एनआयबीएम रोड येथे असलेले फिरोज रजपूत यांचे न्यू डिजिटली नावाचे दुकान हे कुलूप बंद असताना, काही अज्ञात इस्मानी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 12 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, ब्लूटूथ हँडसेट व स्पीकर अशी एकूण 88 हजार 684 रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी केली. तरी पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.