Pune News : साठ वर्षे जुनी आब्यांची झाडे चोरीला !

अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज : पन्नास ते साठ वर्ष जुन्या असलेल्या पाच आंब्याच्या झाडांची चोरी झाल्याचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला. याप्रकरणी विश्वजित भैयासाहेब निंबाळकर (वय 56) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सहजपूर गावाजवळ फिर्यादी यांची शेती आहे. त्यांच्या या शेतीत 50 ते 60 वर्षे वयाची 5 मोठी आंब्याची झाडे होती. 26 ऑक्टोबरच्या रात्री फिर्यादी शेतात गेले असता त्यांना ही झाडे जाग्यावर दिसत नाहीत. अज्ञात चोरट्याने ही झाडे कापून आणि कुठल्यातरी वाहनात भरून त्याची लाकडे घेऊन गेले आहेत.

फिर्यादीनी तक्रार दिल्यानंतर यवत पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.