Vadgaon Maval : मुद्देमाल म्हणून पकडलेली सुमो गाडी चोरीला

241

एमपीसी न्यूज – पोलिसांनी दरोड्याच्या गुन्हयात मुद्देमाल म्हणून जप्त केलेली टाटा सुमो चोरटयांनी पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरून नेली. ही घटना वडगाव मावळ येथे शनिवारी (दि. 6) रात्री आठ ते सोमवार (दि. 8) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला.

HB_POST_INPOST_R_A

वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रमेश सोपानराव गुंडेवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो (एमएच 14 बीए 4080) जप्त केली. ही सुमो गाडी वडगाव मावळ पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या मैदानात लावली होती. अज्ञात चोरटयांनी ही गाडी शनिवारी (दि. 6) रात्री आठ ते सोमवार (दि. 8) सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान चोरून नेली. पोलिसांनी गाडीचा शोध घेतला. मात्र शेवटी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: