BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान महिलेचे मंगळसूत्र चोरीला

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान महिलेचे एक लाख 20 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (दि.15) दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान धनकवडी ते स्वारगेट या मार्गातील प्रवासात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या बुधवारी दुपारी दीडच्या दरम्यान धनकवडी-स्वारगेट ते पुणे स्टेशन असा पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे एक लाख 20 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरी करून नेले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

HB_POST_END_FTR-A2

.