BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : उधार दिलेले पैसे मागितल्याने डोक्यात घातला दगड 

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – उधार दिलेले पैसे मागितल्याने दोघांनी एका 47 वर्षीय नागरिकाच्या डोक्यात दगड घातला. ही घटना गुरुवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी येथे घडली. 

याप्रकरणी डेनियल दिवाकर सावंत (रा. विजयनगर, काळेवावाडी ) आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिल दिनकर अमोलिक (वय 47, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमोलिक यांनी आरोपी डेनियल याला उधार पैसे दिले होते. अमोलिक यांनी गुरुवारी आरोपींना उधार दिलेले पैसे मागितले. त्याचा राग आल्याने आरोपी डेनियल आणि त्याच्या मित्राने अमोलिक यांना धक्काबुक्की करत हाताने मारहाण केली. तसेच शेजारी पडलेला दगड त्यांच्या डोक्यात मारला. त्यात अमोलिक जखमी झाले आहेत. वाकड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.